| कर्जत | प्रतिनिधी |
राज्य सरकार व केंद्र सरकारने 350 पेक्षा जास्त ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, त्यांचा खेडो-पाडी वापर करण्यासाठी आधुनिक 5जीचे मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून दिले नाही. आता रायगड जिल्ह्यातील शासनाच्या मालकीची असलेल्या बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर वोडाफोन आयडिया, एअर टेल व जीयो सारख्या खासगी कंपनीचा एन्टीना बसवून त्यांना मार्केटिंग करण्यासाठी संधी दिल्या आहेत. त्यामुळे बीएसएनएलचे 2जी/3जीचे काल बाह्य झालेले नेटवर्क अधूनमधून काही ठिकाणी मिळते. त्यामुळे ते सॅटेलाईटद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे आणि शासनाच्या मालकीची असलेली बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क सर्व ठिकाणी लवकरात लवकर 5जी चालू करण्यात यावे. केंद्र सरकारने 5जीचे नेटवर्क थेट सर्व ठिकाणच्या मोबाईल धारकांना मिळेल अशी सक्षम व्यवस्था करावी, अशी मागणी माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केली आहे.







