आरोग्ययंत्रणा पुरविण्याची मागणी

| नवीन पनवेल । वार्ताहर ।
गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या महामार्गावर प्रत्येक वीस किलोमिटरवर तात्पुरती सार्वजनिक आरोग्यविभागची आपतकालीन आरोग्ययंत्रणा व रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी शिरीष घरत, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावरही नवी मुंबईसह पेण-वडखळ, माणगाव, महाड, गोरेगाव, मुरूड, जंजिरा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयात नेहमी वाहतूक करणार्‍या वाहनांपेक्षा लाखो वाहने व गणेशभक्त प्रवास करत असतात. त्यामुळे मोठया प्रमाणावर महामार्गावर संभाव्य अपघाताची संख्या वाढू शकते. महामार्गावर या कालावधीत अपघातांचे प्रमाण वाढत असते, त्याच गर्दीत वाहने बंद पडल्यास मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होवू शकते व रूग्णवाहिकेसही मार्ग सापडणे अवघड होते. तरी संबंधीत वरीष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष वेधून नवी मुंबई वाहतूक पोलिसांसह महामार्ग पोलिसांशी समन्वय करून व सर्व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य यंत्रणा आपत्कालिन परिस्थिती सतर्क ठेवण्याचे आदेश देवून महामार्गावर प्रत्येक वीस किलोमिटरवर रूग्णवाहिका व वैद्यकिय पथके उपलब्ध करून दयावी. अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

Exit mobile version