| खोपोली | प्रतिनिधी |
वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रध्वज तिरंगा आणि भारताचे राष्ट्रगीत आणि भारताचा 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचा अपमान आणि विटंबना करणारी विधाने केली आहे. या वक्तव्याच निषेध करण्यासाठी खोपोलीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि शेकापक्षांच्या पदाधिकार्यांनी एकत्रित येत पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक शितल राऊत यांची भेट घेवून भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी रिचर्ड जाँन, डॉ. सुनिल पाटील, शेकापचे शहर चिटणीस अविनाश तावडे, कैलास गायकवाड, शेकाप व्यापारी सेल कार्याध्यक्ष शाम कांबळे, रविंद्र रोकडे, माजी नगरसेवक मोहन औसरमल, तुकाराम साबळे, किशोर पानसरे, मंगेश दळवी, सुवर्णा मोरे, संदेश धावारे, सागर जाधव, प्रविण क्षिरसागर, शेखर जांभळे, हुसेन खान, अबू जळगांवकर, मनोज माने, हनिफ दुदुके यांच्यासह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.