क्रिकेट थीम हटविण्याची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

नवीन पनवेल येथील आदई सर्कलला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यात आलेले आहे. असे असतानाही त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून क्रिकेट थीम उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिक व क्रांतिवीरप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. ही क्रिकेट थीम येत्या 15 दिवसांमध्ये हटवून त्या ठिकाणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक उभारण्यात यावे. अन्यथा पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे एक लाक्षणिक उपोषण आदई सर्कल येथे करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक यांनी दिली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे.

Exit mobile version