रसायनीमार्गे पेण बस सुरू करण्याची मागणी

| रसायनी । वार्ताहर ।
दांडफाटा, रसायनीमार्गे कर्जत आगाराच्या पेण, अलिबाग एसटीच्या फेर्‍या चालविण्यात येतात. मात्र एसटी संपापूर्वी सुरू असलेली रसायनीहून सकाळी पावणेदहाची बस अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. कर्जत रसायनीमार्गे पेण या बसने कर्जतहून रसायनीत येणार्‍या, तसेच रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील कारखाने आणि गावातील नागरिकांना पेण, अलिबागकडे जाण्यासाठी ही बस सोयीची आहे. पिल्लई महाविद्यालयात चौक परिसरातून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठीही बस सोयीची आहे. त्यामुळे कर्जत येथून पेणकडे जाणारी एसटी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी जनजागृती ग्राहक मंचाचे आर. डी. सोमण यांनी केली आहे.

Exit mobile version