धोकादायक इमारती पाडून टाका

 | आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरातील धोकादायक इमारत किंवा मोडकळीस आलेल्या भाग काढुन टाकावा व जिवितहानी टाळावी, असे आवाहन मुरुडचे नगरपरिषदे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले.

अवकाळी पाऊस, मान्सूनचा पाऊस व वादळ वा-यामुळे जुन्या व धोकादायक स्थितीत असणा-या इमारतीचा पडावु धोकादायक असलेल्या भाग, मजला अथवा संपुर्ण इमारत पाडून घरमालक व इमारत मालकांनी  सहकार्य करावे. इमारतीचा किंवा घराचा भाग पाडतेवेळी परिसरातील रहिवाशांना रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना जीवितास क्षती-हानी होऊ नये त्यांची काळजी घ्यावी. जर कोणाला दुखापत झाली तर मुरुड-जंजिरा नगरपरिषद जबाबदार राहणार नाही. सदर बाबीस घरमालक किंवा इमारत मालक जबाबदार राहतील. तरी पावसाळ्याच्या आत  धोकादायक इमारत किंवा मोडकळीस आलेल्या भाग काढुन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले.

Exit mobile version