क्रांतीदिनी कामगारांची निदर्शने

मुंबई | प्रतिनिधी |
कामगार संघटना कृती समितीच्या वतीने 9 ऑगस्ट 2021 रोजी क्रांतिदिनी वाढती महागाई, शेतकरी व कामगार विरोधी कायदे, देश वाचवा इत्यादी मागण्यासाठी क्रांती मैदान येथे सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने प्रचंड निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये कामगार संघटना कृती समितीचे नेते अ‍ॅड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज, शंकर साळवी, संजय वढावकर, जे. आर. भोसले, निवृत्ती धुमाळ, विश्‍वास उटगी, कॉ.एम. ए. पाटील, विवेक मोंटेरो, कॉ. प्रकाश रेड्डी,विद्या चव्हाण, रमाकांत बने, अशोक जाधव, मुकुंद वाजे, विद्याधर राणे, मारुती विश्‍वासराव, शीला भगत, दत्ता खेसे, विजय कुलकर्णी, देविदास महाले, विकास गुप्ते, कॉ . उदय चौधरी तसेच कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version