उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

। मुंबई । प्रतिनिधी ।
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे. त्यानी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

Exit mobile version