। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक नियमांत शिथिलता आणली गेली. मात्र, कोरोनाचा धोका कायम आहे. काही ठिकाणी कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांना दुसर्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपली प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.