। मुरुड । वार्ताहर ।
नवभारत साक्षरता या बहुचर्चित उपक्रमांतर्गत राज्य शिक्षण संचालनालयाचे शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब सरस आणि महेंद्र बागडे यांनी मुरुड तालुक्यातील अनेक शाळांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले.
यामध्ये चोरढे मराठी शाळेला भेट दिली असता उल्लास अॅप इंस्टॉल करणे, शिक्षकांना टॅग करणे, स्वयंसेवक नेमणे, प्रत्यक्ष असाक्षरांना शिकवणे, त्यांच्या नोंदी, फोटोग्राफ्स, उपस्थिती पत्रक आणि अनुषंगिक सर्व रेकॉर्डची तपासणी केली. मुरुड-जंजिरा तालुक्याचे नैसर्गिक वैभव, येथील शैक्षणिक वातावरण, असाक्षरांसाठी शिक्षक घेत असलेली एकंदर मेहनत पाहून समाधान व्यक्त करत कौतुकाची थाप दिली. यावेळी शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असल्याचे सांगून यात सातत्य ठेवण्याचे आवाहनही केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, महेश कवळे, संदीप पाटील, चेतन पाटील, दत्ता सातामकर, संतोष पुकळे, संगीता भगत, राजेंद्र नाईक, विजय जाधव, प्रतिभा वर्तक, इर्षाद बैरागदार आदी उपस्थित होते.