पाली शहराचा कायापालट करणार देसाई

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीकरांचे पिण्याच्या शुद्ध पाण्याचे स्वप्न शिवसेनाच पूर्ण करेल, शिवसनेच्या नगराध्यक्षा, नगरसेविका विकासकामांनी पाली शहराचा कायापालट करणार असा विश्‍वास शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाशदेसाई यांनी व्यक्त केला.याप्रसंगी प्रकाश देसाई, अनुपम कुलकर्णी, रविंद्र देशमुख, संजय म्हात्रे, संदीप दपके, नगराध्यक्षा प्रणाली शेळके व नगरसेविका तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या हस्ते विकासकामांचे नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुरज शेळके, सुबोध पालांडे, संकेत दपके आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

पाली शहरातील विविध प्रकारची लोकाभिमुख जनकल्याकारी विकास कामे शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. आता पुन्हा 2 कोटी निधीच्या विकास कामांचे भूमी पूजन करून विकासकामांना जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. तसेच पालीकरांचे फिल्टर पाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून फिल्टर पाण्यासाठी 30 कोटी रुपये मंजूर झाले असून, 19 लाख रुपये टी.एस पाली नगरपंचायत वर्ग केली आहे. त्याचबरोबर पाली शहराच्या विकासासाठी अधिक 10 कोटींच्या विकास कामांची तरतूद देखील केली आहे. असे रायगड जिल्हा युवा प्रमुख संजय म्हात्रे यांनी सांगितले.

Exit mobile version