सुतारवाडी प्रीमियर लीग
|सुतारवाडी|वार्ताहर|
सुतारवाडी येथील तरुण क्रिकेट प्रेमींनी एकत्र येऊन 26 जानेवारीला सुतारवाडी प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन सुतारवाडी येथील लहू पुराडकर मैदानात केले होते. अत्यंत शिस्तबद्ध, खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धे संपन्न झाल्या. त्यावेळी देशमुख वॉरियर्स (संघ मालक संतोष देशमुख) अंतिम विजेता ठरला. तर द्वितीय क्रमांक सुतार वॉरियर्स (संघ मालक नितेश सुतार) हा ठरला. विजयी संघाला भव्य चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सोहम चिविलकर, मालिकावीर म्हणून ऋतिक देशमुख तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून आशिष सुतार यांना गौरविण्यात आले. सामन्यांचे समालोचन योगेश जाधव यांनी केले. सामने यशस्वी करण्यासाठी सर्व संघ मालक, खेळाडू, सुतारवाडी ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला यांनी परिश्रम घेतले.