| पाली/बेणसे । वार्ताहर ।
स्वदेस फाऊंडेशन कडून सुधागड मधील देऊळवाडी स्वप्नातील गाव म्हणून जाहीर करण्यात आले. गावात अनेक उपक्रमांतून गाव विकास समिती स्वदेस फाऊंडेशन व शासन यांच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून स्वच्छता, सुंदर, स्वास्थ, सक्षम, साक्षर आदी मुद्यावर भरघोस कामे केली आहेत. यामध्ये शेळी पालन, कुक्कुटपालन व्यवसाय, गावातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, आरोग्य, शिक्षण, परसबाग लागवड व विक्री, महीला बचतगट, छोटे छोटे उद्योग, विषेश म्हणजे ग्रामस्थानी एकत्र येऊन गावातील अनेक घरांचे शोषखड्डे कोणत्याही आर्थिक निधीची वाट न पाहता श्रमदान करुन बनविले आहेत. अशा अनेक उपक्रमांतून गाव आदर्शवत बनविले आहे. यावेळी सर्व समिती सदस्य व ग्रामस्थांचे कौतुक करत स्वप्नातील गाव देऊळवाडी स्वदेस फाऊंडेशन संचालक राहुल कटारिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी आ. धैर्यशील पाटील, शिवदास वायाळ, समीर शेख, भास्कर पार्टे, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, नितीन भोसले, गटविकास अधिकारी, स्वदेसचे इक्तार पठाण, गणेश मुरगुडे, सोनाली पवार, स्वानंद केळसकर, राकेश मोरे, महेश गोरेगावकर, जितेंद्र म्हात्रे, अमोल गवई, श्रीराम पन्हाळकर, पंचक्रोशीतील नागरिक तसेच, तरूण मंडळ व महिला मंडळ बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
देऊळवाडी येथील महिला व पुरुषांनी पारंपारिक वेशभुषा करत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांनी ग्रामस्थांचे कौतुक करत गावाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक समितिचे वामन माडे यांनी करत स्वदेस फाऊंडेशनकडून असंख्य विकासकामे केली आहेत असे सांगितले.