भोईराज प्रिमियर लिगमध्ये देवांशी सेव्हन स्टार विजेता

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील दहिवली गावातील भोईराज मित्र मंडळ यांनी भोईराज क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सेव्हन स्टार हा संघ अंतिम विजेता ठरला. सात्विक इलेव्हन हा संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत ग्रामीण आणि शहरी अंडरआर्म क्रिकेट संघ सहभागी झाले होते.स्पर्धेचे उदघाटन आडगावाचे भोई समाजाचे अध्यक्ष हरीश सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पदाधिकारी सुनील थोरव, निलेश खाडे, अरुण पवार,अशोक थोरवे,मनोज ढिले,सुनील जाधव,चीनके आदी उपस्थित होते.

भोईराज प्रीमियर लीग मध्ये आठ संघाने भाग घेतला होता.भोईराज पर्मियर लीगचे हे तिसरे वर्षेच असून या स्पर्धेचा अंतिम सामना देवांशी स्टार संघ आणि सात्विक इलेव्हन या दोन संघांमध्ये झाला.अंतिम सामन्यात देवांशी स्टार संघाच्या खेळाडूने शेवटच्या चेंडूवर चौकार मंत्रून संघाला विजेते केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जेष्ठ कार्यकर्ते अशोक महाडिक, अतुल पवार,अनिल पवार,शरद महाडिक तसेच सचिन पवार,आतिश सपकाळ, जितेश पवार, कल्पेश पवार,सचिन पवार आदी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version