महाविकास आघाडी सरकारमुळे विकासाला चालना

आ.निकम यांचे प्रतिपादन
। चिपळूण । प्रतिनिधी ।
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे कोकणातील विकासाला चालना मिळत असल्याचे प्रतिपादन आ.शेखर निकम यांनी केले आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील धामापूर जिल्हा परिषद गटातील करजुवे गावातील आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून मंजूर विकास कामांचा भूमीपूजन सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
संगमेश्‍वर तालुक्यातील कोकरे धामापूर गटातील करजुवे या गावात विविध विकास कामांची भूमीपूजन आ. निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करजुवे गावातील चाफेवाडी, मोरेवाडी, चांदीवाडी, रोहीदासवाडी, बाचीमवाडी या सर्व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. शेखर निकम यांनी आमदार झाल्यापासुन प्रत्येक गावाच्या विकास कामांवर भर दिला आहे. कोरोना काळ, पूरपरिस्थिती या सर्व अडचणीवर मात करुन कोणत्याही गोष्टीची प्रसिद्धी न करता, कोणत्याही स्थितीचे राजकारण न करता शांत व संयमी स्वभावाने आपले समाजकार्याचे व्रत चालू ठेवले आहे. अडचणीच्या काळातही जास्ती जास्त विकास निधी मिळवून आपल्या मतदार संघाचा विकास कसा करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना आघाडी झाल्यामुळे सरकार स्थापन झाले त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार होण्याची संधी मिळाली. व मतदार संघाचा विकास करण्यासाठी एक चांगला मार्ग सापडला. त्यातुन वेगवेगळ्या योजनेतून मोठया प्रमाणात निधी कसा मिळेल व त्यातून विकास कामे कशी करता येतील यासाठी सतत पाठपुरावा करुन ती कामे पुर्णत्वास नेली. तसेच कोरोना मुळे काही काळापुरता मतदार संघातला संपर्क तुटला होता परंतु गरज पडली तेथे वेळोवेळी पोहचण्याचा प्रयत्न केला. वादळ व पुरग्रस्ताना मदत, एखाद्या कामाचा विकास करताना तेथे राजकारण आडवे न आणता तेथील काम समाजकार्याच्या माध्यमातून खेळीमेळीच्या वातावरणात पुर्ण करुण त्याचा विकास करावा याचा देखील उल्लेख केला.
करजुवे गावातील कामांची भूमीपूजन केली त्यामध्ये 1) मौजे करजुवे शाळा क्र. 3 ते शाळा क्र. 2 रस्ता सा. क्र. 0/200 ते 2/100, 2) मौजे करजुवे रोहीदास वाडी अंगर्गत रस्ता डांबरीकरण करणे,3) मौजे करजुवे वाकसाल वाडी रस्ता डांबरीकरण करणे, या कामांचा समावेश आहे. विविध योजनेअंतर्गत करजुवे गावाकरिता आमदार साहेबानी विकास कामांकरिता निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यानी आ. शेखरजी निकम साहेबांचे आभार मानले आहेत.
या भूमीपूजन प्रसंगी सुभाष नलावडे, सुशिल भायजे, अजय चांदिवडे, नलावडे सर, मयुर बाष्टे, श्रीकांत नलावडे, सुहास नलावडे, नाना कांगणे, सिताराम बाचिम, कृष्णा बाचिम, भागोजी चांदिवडे, आर. के. बाचिम, मनोहर नलावडे, गणपत चव्हाण, प्रभाकर धनावडे, शिरीष निकम, पांडुरंग यंलवंडे, संतोष डावल, सुरेश रामाणे, रमेश धामापुरकर, ड. सिताराम बाचिम, करजुवे गावचे ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version