शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी
| चाळीसगाव | प्रतिनिधी |
भात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. खते लिंकिंग व बोगस बियाणे रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात त्यांच्या कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांना जामीन देखील मंजूर होऊ नये, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या ननुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली. चाळीसगाव येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा खानदेश विभागीय मेळावा (दि.9) चाळीसगाव येथे घेण्यात आला. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, प्रा. एस.व्ही. जाधव, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, राजेंद्र कोरडे, उमाकांत राठोड, मोहन गुंड आदी मान्यवरांसह शेकापचे पदाधिकारी, वेगवेगळ्या आघाडीचे प्रमूख, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांप्रती राज्य सरकारचे ध्येय धोरणे चुकीचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्य मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमी भाव शासनाने द्यावा. शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, तरच आपला शेतकरी आपल्या जगणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या धान्य मालाला भाव मिळण्यासह विविध विषयांवर शेकापच्या अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन करत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्याची मागणी केली.
गोकुळ पाटील यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचा विस्तार वाढवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे. निर्णय घेण्याची मागणी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी लढा उभारून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
अनेकांचा सत्कार
मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी प्रा .चंद्रकांत ठाकरे, प्रा किरण पाटील, कवी गौतम निकम, शाहीर वाल्मीक फासगे, गणेश भोई, युवराज पाटील, हर्षद अली सय्यद अली, अकील पेंटर, शहाबाद अली, अमोल पाटील, मयूर पाटील, प्रकाश गोपाळ, जानीवल शेख, जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख आदींनी प्रचंड मेहनत घेतली. मेळाव्याचे सुत्रसंचलन योगेश पाटील, व आभार चंद्रकांत ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. प्रास्ताविक गोकूळ पाटील यांनी केले. दरम्यान मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आदर्श सरपंच आदर्श संघटना, आदर्श शेतकरी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध सामाजिक संघटनांचा सत्कार करण्यात आला.