आदिवासीवाड्यांचा विकास: आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

रस्त्याच्या कामांसाठी निधीची मागणी
| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मोरोंडे ते बारशेत आदिवासीवाडीकडे जाणार्‍या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी पुढाकार घेत डोंगरभागात राहणार्‍या आदिवासी समाजाच्या विकासासाठी या रस्त्याच्या कामांसाठी निधीची मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे. त्याला जिल्हा परिषदेकडून हिरवा कंदील मिळाला असून जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यता व निधी मजूरीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्ताव पाठविला आहे.त्यामुळे लवकरच रामराज परिसरातील आदिवासीवाड्यांचा विकास साधण्यास मदत होणार आहे.

रामराज परिसरातील आदिवासी वाड्यांवरील सद्यस्थितीत रस्ता कच्चा आहे. दळणवळणाच्यादृष्टीने तसेच शाळकरी मुले, ग्रामस्थांना हा रस्ता वैद्यकिय उपचाराकामी अत्यंत गैरसोयीचे आहे. ही बाब शेकाप आ. पाटील यांच्या निदर्शनास आली. डोंगर भागात राहणार्‍या आदिवासीवाड्यांमधील समाजाला मुलभुत सुविधा मिळावी यासाठी बांधीलकी जपत मोरोंडे ते सतेवाडी, आदिवासीवाडी रस्ता, मोरांडे ते सतेवाडी बारशेत आदीवासीवाडी रस्ता करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मागणी केली. या मागणी दखल घेत रायगड जिल्हा परिषदेने या कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यता व निधी मंजुरीसाठी पाठविला आहे. लवकरच या भागातील रस्त्याचे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. यापुर्वी देखील त्यांनी डोंगरभागात राहणार्‍या सत्तेवाडी, होंडावाडीमध्ये विजेची सेवा उपलब्ध करण्याची मागणी महावितरण विभागाकडे केली होती.

शेकाप नेते आ.जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आदीवासीवाड्यांमध्ये नागरिकांना या रस्त्याचा चांगला फायदा होणार आहे.- मधुकर ढेबे – माजी सरपंच, बोरघर ग्रामपंचायत

Exit mobile version