| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग शहर आणि परिसरातील पर्यटन दिवंसेदिवस वाढत चालले असून,खबरदारीचा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आ.जयंत पाटील यांनी केली आहे. विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या याप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिबाग शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरीता पोलीस विभागामार्फत माहे जानेवारी, 2023 मध्ये प्राथमिक सर्व्हे करण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीस सादर करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
अलिबाग नगरपरिषदेकडून अलिबाग शहरातील महत्वाच्या ठिकाणी दृष्टीकोनातून सी.सी.टि.व्ही. व संपर्क ध्वनी यंत्रणा बसविण्याकरीता सन 2021-22 व 2022-23 मध्ये जिल्हा नियोजन समिती, रायगड यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता, अशी माहिती शिंदे यांनी दिली. नगरपरिषदेने जिल्हा नियोजन समिती, रायगड यांचेकडे सादर करण्यात आलेले प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. तथापि, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विचारात विद्यमान पालकमंत्री जिल्हा रायगड यांचे निर्देशानुसार अलिबाग शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरीता पोलीस विभागामार्फत माहे जानेवारी, 2023 मध्ये प्राथमिक सर्व्हे करण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीस सादर करण्याची कार्यवाही आहे,असे ते म्हणाले.
मुळ प्रश्नात आ.जयंत पाटील अलिबाग (जि.रायगड) या पर्यटन ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत शहराला पर्यटनाचा दर्जा मिळाल्याने अलिबाग शहरात सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबतचा प्रस्ताव अलिबाग नगरपरिषदेने शासनाकडे दोन वर्षांपूर्वी सादर केला असल्याचे माहे जानेवारी, 2023 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे. वाढत्या पर्यटन संख्येमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यताही वर्तविली. उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करावी, त्या अनुषंगाने बसविण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करुन यंत्रणा कार्यान्वित करावी,अशी मागणीही पाटील यांनी केली.