। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर श्री महागणपती क्षेत्रात, संकष्टी चतुर्थी निमित्ताने शुक्रवारी (दि.3) पावसाची तमा न बाळगता अगदी पहाटेपासूनच भाविकांनी प्राचीन जागृत श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे चार वाजल्यापासून गणेश भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. प्रथमता: श्री महागणपतीची महापूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर गणेश भक्तांनी श्रींच्या दर्शनाला सुरुवात केली. अधून मधून गर्दीचे प्रमाण थोडेसे कमी होत होते. मात्र, पाऊस जसजसा उघडीप देत होता तस तशी मंदिरात गर्दी वाढत होती. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या हार, रान भाज्या, रानटी कंदमुळे, तसेच अन्य पदार्थांच्या विक्रेत्यांच्या दुकानात फारशी गर्दी दिसून आली नाही.






