। दांडगुरी । वार्ताहर ।
हरिहरेश्वर किनार्यावर 16 मीटर लांब संशयास्पद बोट स्थानिकांना आढळून आली. यावेळी धाडस ग्रुपने केलेल्या मदतीची दखल घेत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडेणकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी अध्यक्ष सचिन गुरव, सुयोग लागी, रूपेश मयेकर, सुयोग मयेकर, विशाल जागडे व सहकार्यांचा सत्कार केला. सत्कारानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्वव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांना रेस्न्यू बोट व साहित्य देणार असल्याचे जाहीर केले.