धाकधूक! राज्यात 28 ओमिक्रॉन संशयित रूग्ण

। मुंबई । प्रतिनिधी ।
करोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूच्या प्रकाराने जगामध्ये दहशत माजवली आहे. भारतात गुरुवारी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आणि या विषाणूने अखेर देशात शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा, सरकार सतर्क झाले असून, उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात महाराष्ट्रात एकूण 28 ओमिक्रॉन संशयित रुग्ण सापडल्यानं ही डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. त्यातील 10 संशयित हे एकट्या मुंबईतील आहेत.
देशात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकात हे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याची डोकेदुखी वाढली आहे.
महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकात हे दोन रुग्ण सापडल्याने राज्याची डोकेदुखी वाढली. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेकडो जण परदेशातून आले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 28 संशयित सापडले आहेत. त्यातील 10 जण हे मुंबईतील आहेत. तर इतर उर्वरित शहरांतील आहेत. या 28 जणांपैकी 25 जण हे विदेशातून आलेले आहेत. तर इतर 3 जण हे त्यांच्या संपर्कातील असल्याची माहिती समजते.
गेल्या महिनाभराचा आढावा घेतला तर, मुंबईत विदेशातून परतलेल्यांची संख्या अडीच हजारांहून अधिक असल्याची माहिती आहे. हे सर्व प्रवासी हाय रिस्क देशांतून आलेले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून अशा सर्व लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. यातील 861 जणांचा शोध लागला असून, त्यातील 25 जण हे करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर या 25 जणांपैकी काहींच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, या तीन जणांनी विदेशात प्रवास केलेला नाही.

Exit mobile version