वरसगांव संघ उपविजेता
। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब विभागातील धाक्सूद क्रीडा मंडळ चिल्हे यांच्यावतीने तसेच, कोलाड कब्बडी असो. यांच्या मान्यतेने चिल्हे येथे विभागीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांत अंतिम फेरीचा सामना हा चिल्हे विरुद्ध वरसगांव यांच्यात रंगला. धाक्सूद चिल्हे संघानी वरसगांव संघाचा पराभव करत अंतीम विजेतेपद पटकावले, तर वरसगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे शुभारंभ सरपंच रविंद्र मरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद लोखंडे, अनिल महाडिक, संदीप महाडिक, उमेश लोखंडे, ठमाजी महाडिक, विनायक महाडिक, राम महाडिक, विलास शिंदे, विनायक शिंदे, तुकाराम कोंडे, रविंद्र लोखंडे, डॉ.श्याम लोखंडे, मारूती खांडेकर, महेश ठाकुर, सानप, मंगेश लोखंडे, अशोक खांडेकर, मधुकर कोठेकर, नारायण महाडिक, प्रभाकर शिंदे, सुनील महाडिक, अनंत महाडिक, संतोष महाडिक, वासुदेव महाडिक आदी कब्बडी खेळाडू तसेच रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या स्पर्धेतील धाक्सूद चिल्हे विरुद्ध स्वयंभु वरसगाव हा अंतीम फेरीतील सामना मोठ्या चुरशीची व अटीतटीचा झाला. या सामन्यात धाक्सूद चिल्हे संघाने बाजी मारत वरसगांव संघाला पराजीत करून अंतीम विजेतेपद पटकावले. तर, वरसगांव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच, गावदेवी बाहे तृतीय क्रमांकाचा मानकरी, तर उम्बर्डी संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. यावेळी धाक्सूद चिल्हे संघाचा सनी कोठेकर मलिकावीर, हरिश हलद उत्कृष्ठ पक्कड, तर, वरसगाव संघाचा राज आंब्रुसकर हा उत्कृष्ठ चढाई बहाद्दर ठरला आहे. यावेळी विजेत्या संघाला रोख पारितोषिक आणि चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धाक्सूद चिल्हे च्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.