धाक्सूद संघ ठरला अंतिम विजेता

। कोलाड । वार्ताहर ।

खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रविवारी (दि.22) गावदेवी बाहे यांच्यावतीने महिसदरा पत्राच्या किनार्‍यावरील प्रांगणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामना धाकसुद चिल्हे विरुद्ध धाक्सूद क्रीडा मंडळ चिल्हे संघ यांच्यात पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात धाक्सूद चिल्हे संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर, धाक्सूद क्रीडा मंडळ चिल्हे संघाला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. तसेच, रॉयल किंग शिरवली संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. यावेळी, चिल्हे संघाचा प्रज्योत लोखंडे उत्कृष्ट सामनावीर ठरला आहे. शिरवली संघाचा साहिल पोटफोडे हा स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज ठरला आहे. तर, शिरवली संघाचा राहुल पोटफोडनेे उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान पटकावला आहे. दरम्यान, स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लिंबाजी थिटे, सुभाष माठल, संतोष थिटे, प्रवीण थिटे हे उपस्थित होते. तर, स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ नरेंद्र माळी, अनंत थिटे, दयाराम भोईर, मंगेश चव्हाण, रुपेश बामुगडे, मंगेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version