। पनवेल । वार्ताहर
यंदा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय मोठ्या उत्साहात जोरदार साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्सवात ढोल-ताशाचा दणदणाट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव जवळ आल्याने ढोल-ताशा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. ताल व लयबद्ध वादनाने ही पथके सगळ्यांनाच थिरकायला लावत आहेत. पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाखाली अनेक ठिकाणी चौकाचौकांत मोकळ्या जागेवर ढोल-ताशा पथकांचा जोरदार सराव सुरू आहे.
सध्या गणपतीसाठी नवीन लय, ठेका व ताल शिकण्यासाठी बहुतांश ढोल-ताशा पथकातील तरुणाई सध्या सरावातून मेहनत घेत आहे. गणेश उत्सवानिमित्त जवळपास दीड महिना आधीपासून सराव सुरू आहे. नियमित पथकातील सदस्यांचा दिनक्रम पूर्ण करून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेस सराव चालतो, पथकात साधारण आठ वर्षे वयोगटापासून ते 45 वर्ष वयोगटापेक्षा शंभर ते दोनशेपेक्षा अधिक सदस्यांचा सहभाग असतो. काही पथक सदस्याकडून शुल्क घेतात, तर काही घेत नाहीत, सध्या तरुणाईचा ढोल-ताशा मंडळांमध्ये सहभाग होण्यासाठी मोठा उत्साह दिसत आहे. यासाठी मुलाखतही घेतली जाते, यात एक ते पाच असे पारंपरिक ताल असतात. याला पारंपरिक हात चालवण असे संबोधले जाते. मिरवणुकीमध्ये सहभागी भक्तांना आनंद मिळेल अशा ठेक्यांना अधिक पसंती मिळत आहे. गणपती निमित्त जवळपास दिड महिना आधीपासून सराव सुरु होतो. बहुतांश पथकांचा सायंकाळी 5 ते 8 या वेळेत जंगी सरवा चालतो. पथकात साधारण 8 ते 9 वयोगटापासून 45 वर्षे वयोगटाचे सदस्य असतात. शेकडो सदस्य प्रशिक्षित झाले आहेत. सदस्यांना सरावासाठी नियमित हजर राहून मेहनत घ्यावी लागते. काही पथक सदस्यांकडून शुल्क घेतात तर काही घेत नाहीत. बहुतांश ढोल पथक आपला नवीन ठेका व ताल यांचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करतात. यात 1 ते 5 असे पारंपारिक ताल असतात. याला पारंपारिक हात चालवणे असेही म्हटले जाते. लोक आनंदी होऊन डोलू व नाचू लागतील अशा ठेक्यांना अधिक पसंती मिळते. सध्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सार्वजनिक मिरवणूक, जयंती मिरवणूक, पाडवा अशा विविध सणांना ढोल-ताशा पथकांची मागणी आहे. प्रत्येक ढोल-ताशा पथकाचे स्वतःचे काही नियम आहेत.
गणपती निमित्त जवळपास दिड महिना आधीपासून सराव सुरु होतो. बहुतांश पथकांचा सायंकाळी 5 ते 8 या वेळेत जंगी सरवा चालतो. पथकात साधारण 8 ते 9 वयोगटापासून 45 वर्षे वयोगटाचे सदस्य असतात. शेकडो सदस्य प्रशिक्षित झाले आहेत. सदस्यांना सरावासाठी नियमित हजर राहून मेहनत घ्यावी लागते.