धोनीनं हार्दिकला धुतलं

| मुंबई | वृत्तसंस्था |

वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीचा जुना अवतार पाहायला मिळाला. ‘थाला’ नं शेवटच्या षटकात फलंदाजीला येऊन हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूंवर सलग 3 षटकार ठोकले. धोनी 4 चेंडूत 20 धावा करून नाबाद परतला. हार्दिक पांड्याच्या या शेवटच्या षटकात 26 धावा निघाल्या. धोनी जेव्हा षटकार मारत होता तेव्हा वानखेडे स्टेडियमवरील चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुंबई विरुद्ध धोनी शेवटच्या षटकात फलंदाजीला उतरला. त्यानं 500 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या माहीनं 4 चेंडूत 3 षटकार मारत 20 धावा केल्या. हार्दिक पांड्या मुंबईसाठी शेवटचं षटक टाकत होता. दुसर्‍या चेंडूवर त्याला डॅरेल मिशेलची विकेट मिळाली. यानंतर धोनीने येऊन सलग तीन चेंडूंवर तीन षटकार मारत हार्दिक पांड्याची लाईन-लेन्थ बिघडवून टाकली. धोनीच्या या खेळीचं कौतुक आता जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू करत आहेत.

Exit mobile version