धुमाळ गुरुजी यांचे निधन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि समाजसेवक मोहन कृष्णा धुमाळ यांचे शनिवारी (दि.9) निधन झाले. निधनासमयी ते 75 वर्षाचे होते. मोहन धुमाळ हे कुसुंबळे पंचक्रोशीतील चिखली येथील रहिवासी होते. ते हाडाचे शिक्षक व समाजसेवक होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक, क्रिडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळीनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोहन धुमाळ यांचे दशक्रिया विधी सोमवारी (दि.18) नाशिक येथे होणार असून, तेरावे (उत्तरकार्य ) गुरूवारी (दि.21) चिखली येथे राहत्या घरी होणार असल्याची माहिती धुमाळ कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version