दिबांचे नाव विमानतळास कधी? : जनतेचा सवाल

| उरण | वार्ताहर |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा. पाटील असे नामांतर केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. या विमानतळाच्या नामकरणावरून वादंग उठले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या महाविकास आघाडीने लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केला होता. त्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर ठाकरे सरकार जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. त्यांनी हा ठराव रद्द करून पुन्हा नव्याने ठराव घेतला होता. त्याला आता जवळपास दीड दोन वर्षे होऊनही आजतागायत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आलेले नाही.

दरम्यान, मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाचा वापर करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून झाला. मुख्यमंत्री शिंदे सरकारने ठराव घेऊन आज कित्येक महिने उलटूनही पुढील कोणतीच सोपस्कार झालेले दिसत नाही. मतदानासाठी काही तासांचा अवधी उरला आहे. निवडणूक झाल्यावर निवडून येणारा उमेदवार अथवा त्यांचे पक्ष यासाठी कशावरून पाठपुरावा करतील, अशी चर्चा दबक्या आवाजात उरणच्या मतदारात सुरू आहे.

Exit mobile version