समुद्रातील डिझेल चोरीचा पर्दाफाश

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त; दहा जणांना अटक

| मुंबई | प्रतिनिधी |

भाऊचा धक्कापासून 800 मीटर खोल समुद्रात डिझेल चोरीचा प्रकार येलोगेट पोलिसांनी उधळून लावला. दोन मोठ्या बार्जमध्ये भरून 10 हजार लिटर डिझेल पोलिसांनी पकडले. याप्रकरणी 10 जणांना अटक करून 4 कोटी 59 लाख 15 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

भाऊचा धक्क्यापासून 800 मीटर खोल समुद्रात श्री अनंत लक्ष्मी, पीएनो 430 तसेच एम.टी.प्रणय, बीडीआर या दोन बार्जमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे डिझेल असल्याची माहिती येलोगेट पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली येलोगेट पोलिसांनी तेथे धडक देऊन दोन्ही बार्ज ताब्यात घेतले. श्री अनंत लक्ष्मी बार्जमध्ये 8 लाख 73 हजार किमतीचे 9700 लिटर डिझेल मिळून आले, तर त्या शेजारीच असलेल्या एम.टी. प्रणय बार्जमध्ये 27 हजार किमतीचे 300 लिटर डिझेल मिळून आले. या दोन्ही बार्जमधील सदर डिझेल चोरीचे असून ते विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बीएनएसएस 2023 च्या विविध कलामन्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी यासीन मुजावर, रामराज सिंग, कमलेश दीक्षित, दीपक कुमार सिंग, लोकेशकुमार सैनी, राजन कुमार यादव, प्रदीप कुमार वैद्य, गोपाल कुवर, नेत्रा कुवर, दिपेंद्र कुवर या 10 जणांना अटक केली.

Exit mobile version