| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड शहरातील कोळीवाडा येथील अर्पेश जंजिरकर व इतर रहिवाशांनी दि.1 जुलै रोजी मुरूडच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उपअभियंतांकडे अर्ज दिला होता. त्या अर्जातून घरासमोरील तुटलेल्या अवस्थेतील पोल बदलण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, विद्युत महामंडळाने त्या अर्जाकडे कानाडोळा केला आणि अखेर रविवारी (दि.5) पहाटे हा विद्युत पोल अचानक कोसळला. सुदैवाने पहाटेच्या सुमारास परिसरात वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांनी मुरूड विद्युत महामंडळाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जीर्ण विद्युत पोल कोसळला
