पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम

| पनवेल | प्रतिनिधी |

शेकापच्या पनवेल शहराध्यक्षपदी दिलीप कदम यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. दिलीप कदम यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. त्यामुळे त्यांना पनवेल महानगरपालिका शहराध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देवेंद्र मढवी, चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी बोलताना, शेकाप वाढविण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करणार असून तळागळातील लोकांना पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देवू, असे मत नवनिर्वाचित शहराध्यक्ष दिलीप कदम यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version