। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोळघर येथील शेकापक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा संगीत शिक्षक दिलीप जनार्दन पाटील यांचे 19 मार्च रोजी आकस्मित निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. पाटील हे स्वभावाने मनमिळावू, हसतमुख, सहकार्यवृत्ती होते. उत्कृष्ट तबलावादक मृदंगवादक अशी त्यांची कोळघर पंचक्रोशीत ख्याती होती. कोएसो माध्यमिक विद्यालय बामणगाव येथे 25 वर्ष संगित शिक्षक म्हणून सेवा करून त्यांनी स्वेच्छासेवा निवृत्ती घेतली. त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत व धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सून, मुलगी, जावई, भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी व काका परिवार असा मोठा आहे.