| पनवेल । वार्ताहर ।
स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये पनवेल महानगरपालिकेने सहभागी होत महानगरपालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ भारत’ सर्वेक्षण 2.0 मोहिमेच्या जनजागृतीसाठी ब्रॅन्ड अम्बेसिडरपदी प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
शहर स्वच्छ रहावे, नागरिकांना स्वच्छतेची सवय व्हावी, घन कचरा व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने व्हावे, शौचालयांची स्वच्छता अशा अनेक कार्यक्रमांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी केंद्र शासनाच्यासवतीने ‘स्वच्छ भारत’ हे अभियान राबविले जाते. स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये वरचा क्रमांक पटकावत आहे. यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये 1 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटामध्ये राज्य पातळीवर 34 शहरांमध्ये महानगरपालिकेचा वा क्रमांक प्राप्त झालेला आहे. तसेच देशपातळीवर 382 शहरांमध्ये 17 वा क्रमांक प्राप्त झालेला आहे.
या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे महापालिकेस मदत करणार आहेत. याचबरोबरीने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी प्रसिध्द क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेचा विजेता सागर म्हात्रे महापालिकेस सहकार्य करणार आहे. यांच्या मदतीने महापालिका स्वच्छतेविषयी विविध उपक्रम राबविणार आहे.