| उरण | वार्ताहर |
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सदिच्छा भेटीसाठी उरण विधानसभा मधील पदाधिकारी व शिवसैनिकांत मातोश्रीवर उत्साह वाटत होता. तशा प्रकारचा उत्साह उरणमध्ये कधी दिसेल अशी चर्चा शिवसैनिकांत सुरू आहे.
मतदारसंघातील सर्व आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मातोश्री, मुंबई येथे पक्षप्रमुख ठाकरे यांच्या सदिच्छा भेट घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या चेहर्यावर उत्साहाचे वातावरण दिसत होते. तसेच शिवसेनेला धनुष्यबाण ऐवजी मशाल चिन्ह मिळाले आहे. ते अनेक ठिकाणी मशालची प्रतिकृती करून घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. उरणच्या पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्साह आज मातोश्रीवर दिसला तशा प्रकारचा उत्साह उरण परिसरात संचारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याची चर्चा उरणमधील शिवसैनिकांत सुरू आहे.