मोस्ट बॉडी इंप्रुव्हमेंटचा मानकरी विशाल बानकर
84 शरीरसौष्ठवपटूंचा स्पर्धेत सहभाग
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग क्रीडा महोत्सवात आयोजित केलेल्या स्पर्धेत दिनेश राठोड यांनी ‘नवोदित रायगड श्री’वर आपले नाव कोरले. मोस्ट बॉडी इंप्रुव्हमेंटचा किताब विशाल बानकर यांनी पटकावला. युवा शेकाप आणि बी यु प्रोडक्शन यांनी आयोजित केलेल्या नवोदित रायगड श्री या शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा वजनी गटात घेण्यात आली. पाच गटांमध्ये आलेल्या स्पर्धेला रायगड जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंनी आपली हजेरी लावली होती. प्रत्येक गटात असणार्या खेळाडूंमध्ये पाच जणांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
खरी चुरस गट क्रमांक चार आणि पाचमधील शरीरसौष्ठवपटूंमध्ये पहावयास मिळाली. गट क्रमांक चारमधील विजेता विशाल बानकर आणि गट क्रमांक 5 मधील विजेता दिनेश राठोड यांच्यामध्ये ‘नवोदित रायगड श्री’साठी लढत या लढतीत दिनेश राठोड यांनी बाजी मारली. पहिल्या गटात हर्षद ठाकूर, दुसर्या गटात ऋषीकेश म्हात्रे, तिसर्या गटात मकरंद पलंगे, चौथ्या गटात विशाल बानकर आणि पाचव्या गटात दिनेश राठोड यांनी अव्वल येण्याचा मान मिळविला होता.