वनसंपदेची प्रचंड हानी, जैवविविधता धोक्यात, वनखात्याचे दुर्लक्ष
| गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यात वणवे लावण्याच्या प्रमाणात आता प्रचंड वाढ झाली असून अक्षरशः तालुकतातील डोंगरच्या डोंगर आगीच्या भस्मस्थानी होरपळतांना दिसत आहेत. त्यामुळे प्रचंड वनसंपदेची हानी होत असल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली असून याकडे वनखात्याचे दुर्लक्ष व डोळे झाक होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
दररोज डोंगरांना प्रचंड लावण्यात येत असलेल्या वणव्यामुळे रोहा तालुक्यातील खांब, देवकान्हे, मालसई, या ठिकाणचे डोंगर सायंकाळच्या सुमारास अक्षरश: या वणव्यात होरपळताना दिसतात. तर सततच्या लागत असलेल्या वणव्यामुळे डोंगरात वनव्यांची र्हास तर आगीचे तांडव यांनी वनसंपदेची प्रचंड हानी होत असुन यामुळे पर्यावरण प्रेमी तसेच नागरिकांचा जिव तुटत आहे. तर हाकेच्या अंतरावर असलेल्या कोलाड, रोहा येथील वनखात्याला मात्र याच काहीच वाटत नसल्याचे एकंदरीत परिस्थिती वरुन दिसुन येत असल्याने वनखाते डोळे झाक करत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
मागील जानेवारी महिन्यांपासून हे वणवे लावण्याचे प्रमाण सुरू झाले आहे. वणवे लावल्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने व कायद्याचा धाक नसल्याने लाकडे चोरटे अथवा हातभट्टीदार यांचे अधिक फावत आहे. शिकार करणे, वृक्षतोड करणे, वनसंपदा मिळवणे तसेच सरपणासाठी लागणारा लाकूडफाटा यामुळे वणवे लावले जात असले तरी हे कायद्याच्या चौकटीत बसत नसून सुद्धा वनखाते उदासीन दिसत आहे. वणवे लावणार्यावर कधीही कारवाई झाल्याचे आजतागत दिसून येत नाही अथवा त्यांना पकडण्यास वनविभाग खाते अपयशी ठरत आहे.
शिकारीसाठी आगी
गेली सात ते आठ वर्षांपासून शिकार करणे व इतर कामासाठी डोंगरांना वणवे लावण्याचा प्रमाण वाढत आहे. यामुळे संपूर्ण वनसंपदेची प्रचंड हानी होत आहे. निसर्ग ही दिवसेंदिवस आपले रूप बदलत असतांना दिसत आहे. कधी चक्री वादळ तर वेळेवर येणारा पाऊस कोणत्याही महिन्यात कधीही पडू लागल्याने हवेत उष्म्याचे प्रमाण वाढत आहे.
तीन चार दिवस भयानक असलेली उष्णतेमुळे सर्वजण कमालीचे हैराण झाले आहेत, तर वनात तसेच जंगलात वणवे लावत असल्याने अधिक उष्म्यात प्रमाण वाढ व येथील जैविविधता धोक्यात आले आहे. हे असेच सुरु राहिले तर मानवी जीवनही धोक्यात येईल. यामुळे वनखात्यासह व संबंधितानी याकडे लक्ष देऊन वणवे लावणार्यावर कठोर कारवाही करावी, अशी मागणी देवकान्हे धामणसई विभागातील पर्यावरण प्रेमी तर काही डोंगर पायथ्याशी असलेल्या नागरिकांडून होत आहे.
रोहा तालुक्यातील सुकेळी खांब, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, उडदवने, मालसई, पिंगळसई याला जोडून मेढा हा डोंगर आहे. सदरच्या डोंगर लगत असलेले रहदारी मार्ग असल्याने येणार्या जाणार्यांचे लक्ष सहज वेधून घेत आहे.त्यामुळे वनसंपदे बरोबर प्राण्यांच्या वास्तव्यावर गदा येत आहे. त्यांची जैवविधता धोक्यात येत असल्याने सामाजिक वन विभाग तसेच वनखाते यांनी लक्ष केंद्रित करून वणवे लावण्यार्यावर कारवाही करावी अथवा विविध प्रकारची उपाय योजना आखण्यात यावी.
दिनकर सानप, पर्यावरण प्रेमी