विलिनीकरणाबाबत निर्णय होईपर्यंत थेट पगारवाढ

अनिल परब यांची विधानसभेत माहिती
मुंबई | प्रतिनिधी |
एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत कर्मचार्‍यांच्या थेट पगारात वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत केली. गुरुवारी परब यांनी एसटी संपाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे अनिल परब म्हणाले. तसेच एसटीच्या संपामुळे साडेसहा कोटींचे नुकसान झाले आहे. अशी माहिती अनिल परबांनी दिली.
आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक एसटी संपादरम्यान 36 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या वारसदारांना नोकरी देणार का? असा सवाल भाजप आमदार श्‍वेत महाल्लेंकडून विचारण्यात आला होता. या प्रश्‍नावर उत्तर देताना परिवहन मंत्री परब म्हणाले की, मएसटीच्या 36 कर्मचारी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या वारसांना नोकरी देण्याविषयी सरकारची सकारात्मक भूमिका आहे. याविषयी माहिती घेतली जात आहे. आत्महत्या कशामुळे झाल्या? हे तपासणार जाणार असल्याचे देखील अनिल परब म्हणाले.
ज्या एसटी कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना मदत द्यावी असा एक प्रश्‍न आहे. पण शासनाने बनवण्यात आलेल्या निषकांमध्ये बसणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. खरे म्हणजे जे निकष आहेत, त्यामध्ये जे कर्मचारी बसत नाहीत त्यांना काही मिळत नाही. पण असे असतानाही ज्या कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
कर्मचार्‍यांच्या थेट पगारात वाढ
सरकार या कामगारांच्या बाबतीत सहानुभुती विचार करत आहे. कर्मचार्‍यांच्या थेट पगारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बाकीच्या राज्यांमध्ये जसे पगार आहेत. त्याच्या तोडीचे काहींपेक्षा जास्त पगार देण्यात आलेले आहेत. तरी देखील कर्मचारी विलिनीकरणाबाबत अडून आहेत. काही कामगार कामावर आले आहेत, काही आलेले नाही.

Exit mobile version