मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील एसटी कर्मचार्यांच्या संपावर लवकरच तोडगा निघेल, असा आशावाद खा.संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यानी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी विविध मुद्यावर चर्चा केली.त्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी ङ्गमहाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतंय आणि का भडकवतंय त्यामागचा हेतू काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण, का करतंय यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. असा आरोप केला.
एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नाविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे. जे जे त्यांच्यासाठी करता येणं शक्य आहे ते सरकार करत आहे. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांनी चर्चाही केली आहे. मला पवारसाहेबांसोबतच्या बैठकीतून असं समजलं की त्यांनी काही सकारात्मक सूचना दिलेल्या आहेतफ, अशी माहिती राऊत यांनी दिली.
परिवहन मंत्र्यांच्या निवासस्थानावर काळी शाई फेकणारे ताब्यात
एसटी कर्मचार्यांचा संप चिघळला असून मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर काळी शाई फेकण्यात आली. जनशक्ती संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी शाई फेकली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानी गोंधळ देखील घातला. त्यानंतर या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.