मुंबई | प्रतिनिधी |
पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेत ज्या ग्राहकांचे पैसे अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते 10 वर्षात पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेद्वारे घोटाळेग्रस्त पंजाब पीएमसी बँकेच्या संपादनाला सुकर करण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
या संदर्भात आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, युएसएफबी 1100 कोटी रुपयांच्या फंडसह सेटअप तयार करत आहे. रेग्युलेटरी नियमांनुसार स्मॉल फायनान्स बँकांसाठी केवळ 200 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ड्राफ्ट स्कीमअंतर्गत, 1900 कोटी रुपयांचे इक्विटी वॉरंट आहे, जे 8 वर्षांच्या कालावधीत कधीही वापरले जाऊ शकते. हे इक्विटी वॉरंट युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला 1 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आले आहे. आरबीआयने या मसुद्यावर 10 डिसेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.