सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
| पुणे | प्रतिनिधी |
पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी देवस्थान ट्रस्टवर देवीच्या भक्तांमधून दोन सदस्य निवडण्याकरिता घेण्यात येणार्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकविरा देवस्थान ट्रस्टच्यावतीने नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर व इतर यांनी नवी मुंबई येथील देवीचे भक्त अॅड. चेतन रमेशदादा पाटील यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाहून लावत त्वरित निवडणूक घेण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत.
कार्ला येथील श्री एकवीरा देवी ही कोळी, आगरी, भंडारी, भोई, वैती, मांगेला या समाजाची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टवर सात सदस्यांची निवड करण्यात आली असून, या सात सदस्यांनी देवीच्या भक्तांमधून दोन सदस्य निवडण्याकरिता उमेदवारी अर्ज मागविले होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने या अगोदर आदेश दिलेले असतानादेखील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्यावतीने नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर व इतर यांनी अॅड. चेतन रमेशदादा पाटील यांचे विरोधात कोळी, आगरी, भंडारी, भोई, वैती, मांगेला व एकवीरा देवीच्या भक्तांवर अन्याय करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एसएलपी या माध्यमातून पुन्हा एकदा याचिका दाखल केली होती; परंतु श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट वतीने नवनाथ देशमुख व इतर यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, तात्काळ त्वरित इलेक्शन घेण्याकरता निर्देश दिले आहेत.