| पेण | प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी अलिबाग रायगड यांच्या संकल्पनेतून आजादी अमृत महोत्सव कार्यक्रमाचे औचित साधून व जिल्हा रुग्णालय अलिबाग व उपजिल्हा रुग्णालय पेण यांच्या संयुक्त विद्यमानाने अपंग विकलांग व प्रमाणपत्र वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार व तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर राजीव तांबाळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यामध्ये एकूण अस्थिव्यंग 55 नेत्र 22 व बालरोग लाभार्थी दाखल झालेले होते. व सर्वांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले व जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील डॉ. गौतम देसाई, डॉ. महालिन शिरसागर, डॉ.अजय इंगळे , डॉ. अशिष मिश्रा, डॉ. पावसकर तसेच सुशील साईकर, अक्षय गोरे, प्रतिम सुतार भोईर, ज्ञानदीप हितेश जाधव, अस्मिता सुतार, मिरा काटे, गीता भौड, सविता मोकल, मालन पाटील, पांडुरंग गाडे, अमोल नरखडे, या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.