जि.प.सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांची कबुली
उदय सामंत यांची उपस्थिती
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांचा शनिवारी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मेळावा भरवण्यात आला होता. पण, कामाचा आढावा सांगून आघाडीसाठी भरवलेल्या या मेळाव्यात शिवसेना कार्यकर्त्यांचीच आपआपसातल्या वादांची बिघाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात जि.प. सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांमध्येच मतभेद असल्याची जाहीर कबुली दिल्याने शिवसेनेतील मतभेत चव्हाट्यावर आले आहेत.
गेल्या महिन्याभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधली पाहायला मिळत असलेली जाहीर नाराजी शिवसेनेमध्ये मतभेद असल्याचे सातत्याने जाणवत होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथे झालेल्या शिवसेना पदराधिकारी,कार्यकर्ता मेळावा भरवला होता. याच मेळाव्यात जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्याची कबुली दिली. तसेच कार्यकर्त्यांनी आपसातले मतभेद बाजूला ठेवून आता येणार्या जि.प. निवडणूकांसाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.
आढाव्यात बोटावर मोजण्याइतकी कामे
शिवसेना पदराधिकार्यांच्या झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्यात भाषण करणार्या सर्वच पदाधिकार्यांनी येणार्या जिल्हा परिषद निवडणुूकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचे भाष्य केले. परंतु, पक्षाने केलेल्या कामकाजाचा आढावा देत असताना मात्र कार्यकर्त्यांची दातखिळी बसल्याची स्पष्ट दिसून आले. तीच तीच 4-5 कामं गिरवत हाताच्या बोटावर मोजावीत एवढीच कामे सांगत पक्षाच्या कामकाजाचा आढावा संपविण्यात आला.