जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन शिबिर

। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी कल्याणकर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे सर्व प्रशासकीय अधिकारी सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास तहसीलदार दळवी रायगड भूषण आपत्ती तज्ञ जयपाल पाटील, अनिकेत पाटील, कैलास चौलकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी तहसीलदार मीनल दळवी म्हणाल्या कोणत्याही आपत्तीच्यावेळी ग्रामस्थांनी कायम सतर्क राहून आमच्याकडे संपर्क करावा तसेच शेजारच्या गावात कोणती आपत्ती आल्यास त्यांनाही मदतीला जावे, ज्येष्ठ नागरिक व मुके प्राणी, शेतकर्‍यांना मदत करावी. कार्यक्रमाचे प्रस्तावित तालुका आपत्ती प्रमुख नायब तहसीलदार अजित होळकर उपस्थित होते. तसेच यावेळी जयपाल पाटील, अनिकेत पाटील, सागर पाठक यांनी देखील आपत्ती संदर्भातील माहिती दिली. या कार्यक्रमास 100 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थिती नोंदविली होती.

Exit mobile version