। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनांबाबतृ सूचना तात्काळ मिळाव्यात, तसेच अशा प्रकारच्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी या अनुषंगाने तहसिल कार्यालय, श्रीवर्धन येथे आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांना नैसर्गिक आपत्तीबाबत सूचना व अनुषंगिक माहिती देण्यासाठी 7249579158 व 9284730753 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तहसिलदार सचिन गोसावी यांनी केले आहे.