कुरुळकरांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

अपघात टाळण्याविषयी जयपाल पाटील यांचे मार्गदर्शन

| रेवदंडा | प्रतिनिधी |

शाळेत जाणार्‍या मुलांना रस्ता सुखरुपणे ओलांडता यावा यासाठी गावातील तरुण-तरुणी व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, तसेच रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या वाहतुकीस हात वर करून थांबवून मुलांना रस्ता ओलांडण्यास कायम मदत करावी, यामुळे निश्‍चितच आपण अपघात टाळू शकतो, असे मार्गदर्शन आपत्ती व्यस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी केले. कुरूळ ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह जवळपास दोनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, व्यासपीठावर कुरुळ सरपंच स्वाती पाटील, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील, ग्रामविकास अधिकारी श्रीहरी खरात, माजी सरपंच तथा सदस्य मनोज ओव्हाळ, सदस्य भूषण बिरजे, सदस्य वृषाली पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रवी मगर, अलिबाग ब्रह्माकुमारी केंद्रप्रमुख भारती दीदी व अंजू दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ओलांडताना काय करावे, याविषयी प्रात्यक्षिक दाखविले. 108 रुग्णवाहिकेला कसे बोलवायचे याबाबत माहिती दिली. दरम्यान, फोन करताच पायलट धर्मा शेंडे हे डॉ. जयप्रकाश पांडे व डॉ. काझी यांना घेऊन पोहोचले. डॉ. काझी यांनी 108 रुग्णवाहिकेबद्दल माहिती दिली. आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर करावा, असे सांगितले.

दरम्यान, जयपाल पाटील यांनी आरसीएफ थळ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुजित भोयर यांना फोनवरुन आग लागल्याची बातमी दिली. त्यानंतर 20 व्या मिनिटाला अग्निशमन अधिकारी पी.जी. प्रशांत यांचे सहकारी हनीफ कुरेशी, नीरज खोत, हरिश्‍चंद्र बानकर,तुषार कवळे अजित कांबळे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपस्थित मुले आणि ग्रामस्थांना आज विझवण्याच्या साहित्याची माहिती अधिकारी प्रशांत यांनी दिली.

कार्यक्रमास सुधागड एज्युकेशन शाळेचे विद्यार्थी, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक प्रणय पाटील, आपत्ती व सुरक्षा मित्र सुरेश खडपे, सचिन पाटील, अभिजीत घाडगे, ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विलास पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन केळकर मॅडम यांनी मानले.

Exit mobile version