नेरळ येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

| नेरळ | वार्ताहर |

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी शासकीय वसतिगृह येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करणेत आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मॉकड्रिल प्रात्यक्षिक करण्यात आले. या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, ॲड गोपाळ शेळके, प्रा. निकिता तरे, डॉ अब्दुल वहिद, वसतिगृहाचे गृहपाल घोडके, ॲड पंकज तरे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. निकिता तरे बदलापूर कॉलेजमधील स्व अनुभव सांगताना आपत्ती आणि सुरक्षेसाठी कार्यशाळा महत्वाची असल्याचे सांगितले. तर आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहन चालविण्याचे परवाना नसताना दुचाकी आणि चार चाकी वाहने चालवू नयेत असे आवाहन केले. या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत अपघात प्रसंगी मदत कशी करावी याचे प्रात्यक्षिक देताना 108 रुग्णवाहिलेला फोन केला.फोन केल्यानंतर 20 व्या मिनिटाला 108 रुग्णवाहिका दाखल झाली. त्याचवेळी नेरळ पोलीस ठाण्यातून बीट अंमलदार शेखर मोरे पोहोचले. या कार्यक्रमाचे नियोजन कर्मचारी कांबळे तसेच आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे,आकाश दरवडा, सचिन केवारी, मयूर थोराडे, हर्षद लोहकरे, रवी दरोडा, नरेश मेंगाळ, संदीप दरोडा, राहुल उघडा यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version