महायुतीमध्ये खदखद; शिंदे गटाची नाराजी उघड

। मुंबई । प्रतिनिधी ।

मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन भेदभाव करण्यात आला आहे. आमचा स्ट्राईट रेट पाहता आम्हाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी खदखद व्यक्ती केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील खदखद पुन्हा समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना न्यायिक भूमिका घ्यायला हवी होती. एनडीएमध्ये अनेक पक्षांना कमी जागा असताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गटासोबत दुजाभाव का करण्यात आला? आमच्याकडे सात खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं होतं, असं बारणे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाने 15 उमेदवार उभे केले होते, त्यातील सात उमेदवार निवडून आले आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील एका खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद आणि एकाला राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता होती. पण, त्यांना फक्त राज्यमंत्रीपद मिळालं आहे. मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव या तीन नावांची चर्चा होती. यात प्रतावराव जाधव यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता होती. पण, शिंदे गटाला एकच मंत्रीपद देण्यात आल्याने जाधव यांना संधी देण्यात आली. त्यामुळे बारणे काहीसे नाराज असल्याचं बोललं जातं.

Exit mobile version