| चौक | वार्ताहर |
चौक ग्रुप ग्रामपंचायतची ग्रामसभा कोरम अभावी दोन वेळा तहकूब झाली होती. पुन्हा ही सभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने निर्वाचित सरपंच रितू सुधीर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच राजन गावडे, ग्रामविकास अधिकारी एस.पी.जाधव यांनी ग्रामसभेच्या ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले. महामार्गाच्या जुन्या रोडच्या दोन्ही बाजूस असलेल्या गटारांच्या संदर्भात देण्यात आलेल्या नोटीसीचे निवारण करून प्रत्येक नागरिकांनी आपापली असलेली अतिक्रमणे हटवावीत, असे निर्देश देण्यात आले. जेणेकरून रस्ता -गटारे यांचा विकास करण्यासाठी कोणती अडचण येणार नाही. तसेच ग्रामस्थांना विकासकामे कशा प्रकारे करण्यात येणार आहेत याची पूर्वकल्पना देऊन त्यांचे समाधान केले.
चौक नागरिकांनी गावासाठी विकास कामे सुचविली यांचा ठराव त्वरित लिहून घेऊन ते पूर्ण करण्याच्या प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले.चौक बाजारपेठ ही मोठी असून मुंबई- पुणे -जुना हायवे रोड असल्याने येथे बाजारासाठी येणार्या नागरिकांच्या वाहनांमुळे होणारे ट्रॅफिक व चौक बाजारपेठेत आलेल्या ज्येष्ठ नागरिक, शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी,महिला,यांना सार्वजनिक मुतार्यांची सोय करण्यात यावी अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली .लवकरच या गोष्टी विचारात घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
या ग्रामसभेसाठी सरपंच रितू ठोंबरे, उपसरपंच राजन गावडे, निखिल मालुसरे, सुभाष पवार , अजिंक्य चौधरी,महादेव पिरकड, राजीव पाटील, सौ. प्राची दबके,नैना झिंगे, रीना सोनटक्के,पूजा हातमोडे, वृषाली अंबवणे, सुवर्णा राणे, सीता पवार, स्वाती देशमुख, अश्विनी म्हात्रे,कल्पना शिंगवा, लक्ष्मी वाघ, ग्रामविकास अधिकारी एस. पी. जाधव व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.