घृणास्पद! अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी आणि तीन वर्षीय मुलावर फेकले केमिकल

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून अतिशय घृणास्पद कृत्य केल्याची घटना घडली. पतीने आपल्या पत्नी आणि तीन वर्षांच्या चिमुकल्यासोबत केलेलं कृत्य ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. मालाडच्या मालवणी परिसरात व्यक्तीला (वय ३४) आपल्या पत्नीवर (वय २४) अनैतिक संबंधाचा संशय होता. या संशयावरून पतीने आपली पत्नी आणि तीन वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर केमिकल फेकल्याची घटना घडली.

ही व्यक्ती बेरोजगार असून पत्नी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या खासगी कंपनीत तिथल्या एका पुरुषासोबत तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित पत्नी आणि मुलावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडील केमिकलची बाटली ताब्यात घेऊन ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली आहे. हे केमिकल नेमकं काय आहे आणि किती धोकादायक आहे हे तपासणीनंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version