| पनवेल | प्रतिनिधी।
मुंबईतील वाडीबंदर न्हावा-शेवा येथे ड्रिल ऑईल येथून पोहोचविण्याचे काम करताना टँकरमधील या तेलाची चोरी करणाऱ्या टोळीवर उलवे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 68 लाख 71 हजार 500 रुपये किमतीच्या ड्रील ऑईलसह 6 टँकर जप्त केले आहेत. तसेच 6 टँकरचालक, तेल विकत घेणारा व्यापारी अशा एकूण 7आरोपींना अटक केली आहे.
वाहतूक व्यावसायिक सरफराज अहमद अफताब शेख (47) यांना मुंबईतील वाडीबंदर ते न्हावा सप्लाय बेस येथे ड्रील ऑइल पोहोचविण्याचे काम मिळाले होते. त्यानुसार शेख यांनी सहा टँकरद्वारे न्हावा येथे हे तेल पोहोचविण्याची जबाबदारी चालकांवर सोपवली होती. सर्व चालकांनी टँकरमधील ड्रील ऑइलची चोरी करून ते मोहम्मद जलालुद्दीन मोहम्मद आमिन खान (50) याला विकायला सुरुवात केली होती.







