| पनवेल | वार्ताहर |
दिशा महिला मंच आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त दिशा उत्सवाचे आयोजन कामोठे सेक्टर 6 येथील वामनराव पै सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजसेविका इंदू झा व आर के ग्रुपचे राजेंद्र कोळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उत्सवामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. स्वाती माने, डॉ. रुखसाना खान, डॉ. सुवर्णा माने चोपडे, डॉ. रुक्मिणी अर्जुन, डॉ,स्वाती वारे, डॉ श्वेता गजभिये भालेराव, अनिता जंगम या डॉक्टरांना तसेच शैक्षणिक क्षेत्रातील वीणा साळवी, अर्चना जाधव, निर्मला अरोरा यांना दिशा सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी विनस वूमन्स हॉस्पिटलच्या डॉ. सुवर्णा चोपडे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तर डॉ. श्वेता गजभिये यांनी हॉस्पिटल मार्फत 15 मार्च पर्यंत गर्भवती महिलांनी नोंदणी केल्यास 20 टक्के सुट व मुलगी झाल्यास पाच हजार रु मुलीच्या बचत खात्यात टाकण्याचे जाहीर केले. निलम आंधळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर विद्या मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
महिला दिनानिमित्त दिशा उत्सव
